कर्जमाफी होईपर्यंत हल्लाबोल सुरूच राहणार - आ.सुनिल तटकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |
 

जळगाव-

या सरकारच्या काळात प्रत्येक गोष्टीला शेतकर्‍याला संघर्ष करावा लागत आहे. ज्या शेतकर्‍याची जमीन प्रकल्पात गेली.त्याचा मोबदला मिळण्यासाठी शेतकर्‍याला मंत्रालयात आत्महत्या करावी लागते त्यानंतर शासनाला जाग येते असे आहे हे सरकार .भुसंपादनाच्या मोबदल्यासाठी धर्मा पाटील यांचा बळी गेला. हे आत्महत्यांचे सत्र मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे. या सरकारमधील मंत्री तर शेतकर्‍यांच्या आत्महत्येची हेटाळणी करित आहे. मंत्रालयात आत्महत्या केल्याने प्रसिध्दी मिळते असे विधान भाजपाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी करून आत्महत्याग्रस्तांची अवहेलनाच केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परीषदेत केला.हल्लाबोल यात्रेच्या निमीत्ताने राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आ. सुनिल तटकरे हे जळगाव दौर्यावर होते.

   या दौर्यात पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परीषदेत आ. तटकरे यांनी सांगितले की, हल्लाबोल यात्रेचा हा तिसरा टप्पा आहे.  राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा बिन पैशाचा तमाशा सुरू असल्याची टिका त्यांनी केली. 26 फेब्रुवारीपासुन अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू होत आहे. राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधुन भाजपा सरकारला घेरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतकर्‍याच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेत. या गोष्टीला दोन महिने होत आले तरी देखील कुठल्याही प्रकारची भरीव मदत शासनाकडून झालेली नाही. शेतकर्‍याची विनाअट संपुर्ण कर्जमाफी हाईपर्यंत हा हल्लाबोल सुरू राहणार आहे.

 भाजपाकडुन धार्मिक धृवीकरणाचा डाव रचला जात असुन धर्मनिरपेक्ष शक्ती त्यास थोपविल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पुर्वी निवडणूकीच्या काळातच शासकीय कॅमेरांद्वारे शुटींग केले जात आहे. मात्र सध्याच्या काळात विरोधकांच्या प्रत्येक सभा, बैठका आणि हल्लाबोल यात्रांचेही चित्रीकरण करण्याचा प्रकार भाजपाकडुन केला जात आहे. हल्लाबोल यात्रेला राज्यभरातुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री गोंधळले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपासाठी आ. खडसेंचे मोठे योगदान

राज्यात स्व. गोपीनाथराव मुंडे आणि आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातुन भारतीय जनता पार्टीला बहुजनांचा पक्ष म्हणुन ओळख मिळाली होती. मात्र याच भाजपाने आ. एकनाथराव खडसे यांच्यावर अन्याय केल्याने घर के ना घाटके अशी त्यांची परीस्थीती केली आहे. आ. खडसेंबद्दल सहानुभूती असल्याचे आ. तटकरे यांनी सांगितले.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशीला सहकार्यच

भाजपाने आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी आपण स्वत: आणि माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी पुर्ण सहकार्य केले आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत भाष्य करता येणार नसल्याचे आ. तटकरे यांनी सांगितले. मंत्रीपद मिळण्यापुर्वी शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी शेतकर्यांच्या प्रश्‍नावर भाजपाविरोधात रान पेटविले होते. मात्र मंत्रीपद मिळाल्यानंतर ना. गुलाबराव पाटील हे बंदीस्त झाल्याची टिकाही आ. तटकरे यांनी केली.

 
@@AUTHORINFO_V1@@