भुसावळात रोजगार मेळाव्यात 128 उमेदवारांची प्राथमिक निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |
 
 
भुसावळात रोजगार मेळाव्यात 128 उमेदवारांची प्राथमिक निवड
भुसावळ- 21 फेब्राुवारी
जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, दीनदयाळ अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान , नगरपालिका भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने जुनी नगर पालिका इमारतीमध्ये बुधवार रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात 128 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या रोजगार मेळाव्याचे उदघाटन प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्याहस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून उदय टेकाडे, प्रशांत सरोदे, राजु सुर्यवंशी, राजु आवटे, तडवी,सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता केंद्र जळगाव उपस्थित होते.
युवराज लोणारी यांनी आपल्या मनोगतात युवकांनी निरनिराळया क्षेत्रातील नोकरी व व्यवसायाच्या संधीचा लाभ घेवून बेरोजगारीवर मात करावी असे आवाहन केले.तसेच आजचा मेळावा हा भविष्यातील समस्या सोडवणुकीचे महत्वाचे पाऊल आहे असे सांगीतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी तर सुत्रसंचालन समुदाय संघटिका अलका शिरसाठ यांनी केले.
या मेळाव्यात 310 उमेदवारांनी सहभाग नोंदवला . मेळाव्यात 11 उद्योजक व चार प्रशिक्षण संस्था उपस्थित होत्या.
 
 
 
दरम्यान भुसावळ नगरपालिकेच्या जुन्या सार्वजनिक विहिरीत गजानन चौधरी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यास सय्यद सुलतान सय्यद कबीर यांनी विहिरीत उतरून त्याचा जीव वाचविला . सय्यद सुलतान यांचा गौरव त्याच ठिकाणी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणरी यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेवक राजु आवटे , राजु सुर्यवंशी, राकेश कोल्हे, नमा शर्मा उपस्थित होते. यापुर्वी मनोहर पाटील यांनी असाच आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुमारे 2 वर्षांपुर्वी केला होता.त्याचा जीव वाचविण्यास यश आले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@