मालमत्ता कराच्या वसुलीचे आव्हानआतापर्यंत केवळ ५२ टक्के कर जमातभा वृत्तसेवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |

मालमत्ता कराच्या वसुलीचे आव्हान
आतापर्यंत केवळ ५२ टक्के कर जमातभा वृत्तसेवा

 
 
 
जळगाव-
महापालिकेच्या मालमत्ता कराची एकूण वसुली यंदा देखील केवळ ५२ टक्के इतकीच झाली असल्याने येत्या दोन महिन्यांत वसुलीचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. चालू मागणीसह मागील थकबाकीसाठी आता जप्ती करून लिलावाचा मार्ग अवलंबल्याने वसुली चांगली होण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
मालमत्ता कर ३१ डिसेंबरनंतर भरणार्‍यांना २ टक्के दंडासह रक्कम भरावी लागत आहे. यंदाची करवसुली प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहेे.
महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जानेवारीपासून घरपट्टी थकबाकीदारांची नळजोडणी तोडणे, थकबाकीदारांची यादी प्रसिध्द करणे, मालमत्ता जप्तीची कारवाई करणे अश्या तीन टप्प्यात कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वीच महापालिकेने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून सील केल्या आहेत. त्यांचा लिलाव लवकरच करण्यात येणार आहे.
 
 
 
अशी आहे आतापर्यंतची वसुली
महापालिकेची सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाची एकूण मागणी ७१ कोटी २२ लाख ९३ हजार १५ रुपये इतकी आहे. आजअखेर ३७ कोटी ५३ लाख ४८ हजार ६७४ रुपयांची वसुली झाली आहे. एकूण वसुली केवळ ५२.५९ टक्के इतकी आहे. या वर्षाची मागील थकाबाकी वगळता चालू मागणी ४३ कोटी ७५ लाख ४८ हजार ९२ रुपये इतकी होती. त्यापोटी चालू मागणीची वसुली २८ कोटी २३ लाख १७ हजार ५८४ इतकी झाली आहे. चालू मागणीची ६५ .५४ टक्के वसुली आहे
 
@@AUTHORINFO_V1@@