भुसावळ शिक्षण विभागातर्फे गरजवंताला लाखमोलाची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |
 
 
भुसावळ शिक्षण विभागातर्फे गरजवंताला लाखमोलाची मदत
भुसावळ - येथील शिक्षण विभागाने सामाजिक बांधिलकी जोपासत गरजवंत रुग्णास  मदत निधी जमा करून दिला आहे. १ लाख १० हजार ८६१ रुपये पेंढारकर यांना सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांच्या उपस्थितीत रोख स्वरूपात देण्यात आले.
 सुकलाल पेंढारकर, वय ३५ वर्ष, व्यवसाय मजूरी, रा. शिवाजीनगर हुडको, ज्ञानेश्वरी बिल्डींग, जळगाव हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या संसाराचा गाडा हाकत. त्याला ५ महिन्यापुर्वी कॅन्सर झाल्याचे निदान झाले. घरातले सर्व विकून पुणे उपचार सुरु झाले. ८ केमो थेरपी केल्या. नातेवाईकांनी जमेल तेवढी मदत केली. परंतु उपचार महागडे असल्याने त्यांची मदतही अपुर्ण पडायला लागली. शेवटी उपचारच बंद पडण्याची वेळ आली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना पुढील उपचार करणे शक्य होत नव्हते. निराशेच्या गर्तेत असतानाच पेंढारकरांच्या मित्राने सामाजिक भान असलेल्या भुसावळ येथील पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांना ही माहिती दिली.  अहिरे यांनी त्यांच्या घराला भेट दिली. सर्व परिस्थिती जाणून घेतली. उपचाराचे सर्व दस्तावेज पाहिले  ते अस्वस्थ झाले.  समाज व समाजातील माणसेच यातून मार्ग काढतील असा विचार करून आपल्यापासुनच सुरुवात करावी हे निश्चित झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी कार्यालयात आल्यावर गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, सर्व केंद्र प्रमुख, शिक्षण मंडळाचे निलेश लखोटे, सर्व साधन व्यक्ती, विषयतज्ञ, तीनही डाटा ऑपरेटर यांना मदतीचे आवाहन केले. अन् काही मिनिटातच मदतीचा ओघ सुरु झाला.  सोशल मीडिया, फोन कॉल्स, मेसेज. प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून दात्यांना आवाहन करण्यात आले.
   त्यानुसार शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांनी वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात मदत निधी देणे सुरु केले. हा मदत निधी पाहता पाहता लाखांच्या वर पोहचला. त्यानंतर ही मदत सुकलाल पेंढारकर यांना देण्यासाठी भुसावळ गटसाधन केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते होते. सुमित्र अहिरे यांनी पेंढारकर मदत निधी याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी गजानन नारखेडे, संजू भटकर, सुनील भिरूड, राजेंद्र सुरवाडे, जी.आर. चौधरी, यशवंत धायगुडे, रागिणी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सुकलाल पेंढारकर यांनी भावनिक मनोगत मांडले. अध्यक्षीय मनोगत गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते यांनी व्यक्त केले.
   रोख रक्कम व परस्पर बँकेत जमा झालेला निधी अशी मिळून १ लाख १० हजार ८६१ रुपये पेंढारकर यांना सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांच्या उपस्थितीत रोख स्वरूपात देण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांनी तर आभार विलास तायडे यांनी मानले. यावेळी डॉ. जगदीश पाटील, राहुल महाजन, सतीश जंगले, राजेंद्र ढाके, तुकाराम सोनवणे, अशोक बाऱ्हे, ओंकार पाटील, किशोर देविदास पाटील, रमेश दांगोडे, देवानंद वाघधरे, नावीद खाटीक, शैला कुमावत, चेतना धांडे, संजय गायकवाड, जितेंद्र पवार उपस्थित होते.
जगण्याचे बळ व लढण्याची शक्ती मिळाली - सुकलाल पेंढारकर
भुसावळ शिक्षण विभागाने दात्यांना आवाहन करून माझ्या उपचारासाठी मदत निधी जमा केला. या मदत निधीच्या माध्यमातून मला जगण्याचे बळ व लढण्याची शक्ती मिळाली आहे. मी आयुष्यभर या दात्यांचा ऋणी राहील व आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजकार्याला झोकून देईल, अशी भावना सुकलाल पेंढारकर यांनी व्यक्त केली.
 
@@AUTHORINFO_V1@@