गतिमंद मुलेही जगू शकतात सर्वसाधारण आयुष्य!वेळीच बुध्यांक चाचणी करणे गरजेचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |
 
 
जळगावः 
आपल्याला सुंदर आणि बुध्दिमान बाळ असावे असे प्रत्येक पालकांना वाटते. मात्र गर्भारपणात वाढीदरम्यान बाळाच्या वाढीसाठी योग्य घटक न मिळाल्यास त्याच्या मेंदूची वाढ खुंटते त्यामुळे गतिमंद बालके जन्माला येतात. दिसायला ही साधारण बालकांसारखी नसल्याने समाजात आजही त्यांच्याविषयी उदासिनता दिसते. त्यामुळे वेळीच मुलांची लक्षणे ओळखून त्यांच्यावर लगेच उपचार केला तर भविष्यात तीसुद्धा स्वावलंबी होवू शकतात, अशी माहिती केशवस्मृती सेवासंस्था समुहाच्या अंतर्गत सुरु असलेल्या ‘आश्रय माझे घर’ प्रकल्पप्रमुख अमित पाठक यांनी तरूण भारतला दिली.
बालकांची लक्षणे कोणती, औषधोपचार, मैदानी थेरपी या संदर्भात मानसोपचार तज्ज्ञ पंकज संघवी यांच्याकडून तरूण भारतने सविस्तर माहिती जाणून घेतली.
गतिमंद मुलांची लक्षणे
गतिमंद बालके जन्माला आल्यावर ती साधारण बालकांसारखीच दिसत असल्याने. त्यामुळे हे बालक इतर बालकांपेक्षा वेगळे आहे, हे पालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या बालकांना वेळीच उपचार मिळत नाही. वाढत्या वयानुसार त्यांच्या शरीराचा विकास होतो, मात्र बुध्दीचा विकास खुंटल्याने ती लहान बालकांसारखे वर्तन करतात.
५ वर्षांपर्यंत जसा साधारण बालकांच्या बुध्दीचा विकास झपाट्याने होत असतो. त्याचप्रमाणे गतिमंद बालकांच्याही बुद्धीचा विकास होण्याची शक्यता असते. यामुळे त्यांच्यासाठी योग्य औषधोपचार कोणते याबाबतही त्यांना माहिती नाही. बुध्यांक चाचणीद्वारे गतिमंद मुलाची बुद्धिमत्ता कळते. ही चाचणी शासकीय रुग्णालयात मोफत केली जाते. याविषयी पालकांना माहितीच नाही. त्यामुळे अशा मुलाचे संगोपन कसे करावे हे त्यांना कळत नाही. ही चाचणी केल्यास ते किमान साधारण आयुष्य जगू शकतात
डॉ. पंकज संघवी, मानसोपचार तज्ज्ञ, जळगाव.
‘आश्रय माझे घर’ चे कार्य गौरवास्पद
गतिमंद मुलांचे संगोपन करणे हे पालकांसाठी खूप आव्हानात्मक असते. एका विशिष्ट वयापर्यंतच ते या बालकांचा सांभाळ करू शकतात. त्यानंतर काय? असा प्रश्‍न त्या पालकांना भेडसावतो. या बालकांना हक्काचे घर मिळावे, पूर्णवेळ त्यांना घालविता यावा, इतरांसारखे त्यांनाही समाजात जगता यावे यासाठी केशवस्मृती सेवासंस्थेतर्फे या मुलांसाठी ३ जानेवारी, २०१६ मध्ये सावखेडा शिवारात ‘आश्रय माझे घर’ हा प्रकल्प सुरु करण्यात आला. या ठिकाणी सध्या १४ ते १५ वयोगटाची आणि प्रौढ अशी १४ गतिमंद आहेत. त्यात पाच केअर टेकर, १ क्लिनिकल सायकालॉजिस्ट, व्यवस्थापक असे ६ ते ७ कर्मचारी आहेत. या मुलांंची योग्य काळजी घेत येथे ठिकाणी कुटुंबासारखी वातावरण निर्मिती केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@