इमारतीचा कठडा पडून मायलेकी जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |


 

 
 
तीन गाड्यांचेही नुकसान

 

 ठाणे, दि. 21 (प्रतिनिधी)- खारकर आळी भागातील 40 वर्षे जुन्या असलेल्या न्यू कॅप्टन इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील गॅलरीच्या भिंतीचा काही भाग कोसळून मायलेकी जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका 18 महिन्यांच्या चिमुरडीचा समावेश आहे तर भिंतीचा हा भाग खाली उभ्या असलेल्या कारवर पडल्याने तीन कारचे देखील नुकसान झाले आहे.
 

खारकळ आळी एनकेटी महाविद्यालयाच्या बाजूला न्यू कॅप्टन ही तळ अधिक ४ मजल्यांची इमारत आहे. ही इमारत ४० वर्षे जुनी आहे. या इमारतीमध्ये सात कुटुंबाचे वास्तव्य होते. दुपारी २.३० च्या सुमारास या इमारतीच्या तिसर्‍या मजल्याच्या गॅलरीच्या भिंतीचा काही भाग खाली उभ्या असलेल्या तीन कारवर पडला. यात या तिन्ही कारचे नुकसान झाले आहे. तसेच येथून रिक्षातून जाणार्‍या मायलेकींवर देखील याचा काही भाग पडला. यामध्येदेखील किर्ती सकपाळ (24) यांच्या डोक्याला, खांद्याला दुखापत झाली आहे तर त्यांची 18 महिन्यांची कन्या नेहा सकपाळ हीदेखील यात जखमी झाली असून तिच्यादेखील डोक्याला दुखापत झाली असून तिला अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जीवितहानी झाली नसली तरी रिक्षातून जाणारी एक शाळकरी चिमुरडी यात किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही इमारती रिकामी करण्यात आली असून पालिका ती इमारत तोडण्याची कारवाई करणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@