इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कारचा बिकानेरमधील काररॅलीत सहभाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |
 
 
 
नाशिक : कुठल्याही प्रकारच्या रस्त्यावर धावेल, अशी स्वत: डिझाईन व निर्मिती केलेली कार साकारण्याचे आव्हान नाशिकमधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केले. ‘टीम रिबेल’ च्या माध्यमातून सपकाळ नॉलेज हबच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, रायगड येथील विद्यार्थ्यांसोबत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी देशात प्रथमच होत असलेल्या रॅली कार डिझाईन चॅलेंजमध्ये सहभाग नोंदवित असल्याची माहिती चौधरी यात्रा कंपनीचे संचालन ब्रिजमोहन चौधरी व ’टीम रिबेल’चे कर्णधार हर्ष शाह तसेच उपकर्णधार रोहन कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
याविषयी अधिक माहिती देताना टीमचे सदस्य सर्वेश आर. व्ही. म्हणाले की, ‘‘‘टीम रिबेलचा हा उपक्रम गेल्या ३ महिन्यांपासून सुरू होता. परंतु कार पूर्णत्वास येण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होऊ शकला नाही. अशावेळी कार रॅलीतील सहभागापासून आम्ही वंचित राहणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. चौधरी यात्रा कंपनीच्या संपर्कात येण्याचा योग आला.
 
’टीम रिबेल’ने सविस्तर माहिती चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांना ऐकविली व त्यांनी कुठलाही विचार न करता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व विद्यार्थी पुढे जावेत व नाशिकचे नाव या कार रॅलीत विजयी होऊन नाशिकचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उंचीवर पोहोचावे या उदात्त हेतूने ’टीम रिबेल’ यास कार पूर्णत्वास नेण्यासाठी तत्काळ भक्कम आर्थिक पाठबळ दिले. याबद्दल आम्ही ’टीम रिबेल’तर्फे चौधरी यात्रा कंपनीचे चेअरमन प्रेमचंद चौधरी, संचालक चतुर्भुज चौधरी, महेंद्रपाल चौधरी व ब्रिजमोहन चौधरी, रघुवीर चौधरी यांचे मनापासून आभार मानत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@