चंद्रपूर जिल्हयातील वनौषधी व खाद्यान्नाला शाश्वत बाजारपेठ देणार : रामदेव बाबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा


चंद्रपूर : पतंजलीच्या विविध विक्री केंद्रातून चंद्रपूर जिल्हयातील दर्जेदार तांदुळ विकल्या जातील. तसेच पतंजलीला आवश्‍यक असणाऱ्या विविध वनौषधी शेतकऱ्यांनी शेतात घेतल्या तर या कंपनीमार्फत चंद्रपूर जिल्हा व परिसरातील वनौषधी व खाद्यान्नाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध केली जाईल असे आश्वासन योगगुरू  रामदेव बाबा यांनी  दिले आहे.
 
 
 
 
रामदेव बाबा यांच्या सोबत जिल्हयातील शिर्षस्‍थ अधिकाऱ्यांची मंगळवारी शेतकरी मेळाव्या पूर्वी चर्चा झाली. पुढील महिन्यात २ मार्चला या संदर्भात पंतजलीच्या मुख्यालयात चर्चा होणार आहे. आपल्या पुढील ३ दिवसाच्या वास्तव्यात हे खाद्यान्न व वनौषधीची तपासणी देखील बाबा रामदेव यांच्या नेतृत्वातील चमू करणार आहे. या बैठकीमुळे शाश्वत बाजारपेठेच्या मुदयावर यशस्वी तोडगा निघण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
 
 
बैठकीमध्ये अधिका-यांनी वनपरिसरात व शेतीमध्ये होणाऱ्या पिकांची व वनऔषधीची माहिती दिली. चंद्रपूर जिल्हयामध्ये हजारो शेतकरी सेंद्रीय पध्दतीने धानाचे उत्पादन घेतात. सेंद्रीय तांदुळ विषमुक्त तांदुळ म्हणून प्रयोग शाळेने मान्यता दिली आहे. त्यामुळे या तांदळाची विक्री पतजंलीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी कृषी विभागाच्या अधिका-यांनी यावेळी केली. पतजंलीव्दारे किमान आधारभूत किंमत ठरविण्यात यावी. शेतक-यांना सेंद्रीय धानाचे उत्पादन घेण्याबाबत सांगण्यात येईल, असे अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@