मराठवाड्यातील पाणीप्रश्न सुटणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |




वॉटर ग्रीडसाठी महाराष्ट्र शासनाचा इस्त्रायली कंपनीसोबत करार


मुंबई : मराठवाड्यातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठीच्या दृष्टीने राज्यसरकारने पावले उचलली आहेत. महाराष्ट्र शासन व इस्त्रायल सरकारच्या कंपनी मे. मेकोरोट यांच्यात वाॅटर ग्रीडसाठी करार करण्यात आला. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत हा करार झाला.

दरम्यान, या करारावर मेकोरोटचे अध्यक्ष मोरडेखाई आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत मेकोरोट ही कंपनी मराठवाड्यातील उपलब्ध पाणी साठे, पर्जन्य वृष्टी, भुस्तर रचना, भुजलाची पातळी, पाणीसाठा, वाहून जाणारे पाणी,उपलब्ध पाणी याचा समग्र अभ्यास करून शाश्वत पाणी पुरवठा करण्याचा मास्टर प्लान तयार करणार आहे. तसेच त्याबाबतचा प्राथमिक संकल्प अहवाल सादर करणार आहे.


मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी तसेच शेतीचे पाणी, उद्योगाला लागणारे पाणी एकत्रित उपलब्ध करुन देण्याबाबत मराठवाडा वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. याबाबत मागील महिन्यात इस्त्रायल सरकार व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. त्या अनुषंगाने हा करार करण्यात आला आहे.

बबनराव लोणीकर,
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री
इस्त्रायलच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर होण्यास निश्चित मदत होईल. वॉटर ग्रीडबाबत शासनाने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे.

सदाभाऊ खोत,
कृषी राज्यमंत्री
@@AUTHORINFO_V1@@