भारत वि. दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ आज आमने-सामने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
सेंच्युरीयन : आज दुपारी भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ आमने-सामने येणार आहे. सेंच्युरीयन येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ टी-२० सामना खेळणार आहे. या मालिकेत भारतीय महिला संघाने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले असून आता या पुढील सामन्यासाठी संघ सज्ज झाला आहे.
 
 
 
भारतीय महिला संघाचा हा चौथा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. आज दुपारी ४.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून भारतीय महिला क्रिकेट संघ या साठी सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामना २-१ अशा फरकाने जिंकल्यावर भारतीय महिला क्रिकेट संघ टी-२० साठी सज्ज झाला होता.
 
 
 
एकूण पाच सामने असलेल्या या टी-२० मालिकेत भारताच्या महिला संघाने चांगली कामगिरी केली आहे. टी-२० मालिकेत भारत सध्या २-१ अशा फरकाने पुढे आहे. आजच्या चौथ्या सामन्यात आता भारतीय महिला क्रिकेट संघ कसा खेळतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@