मालदीवमध्ये पुन्हा आणीबाणी लागू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मालदीव : मालदीवमध्ये काल संध्याकाळी आणीबाणी रद्द करण्यात आली असली तरी देखील मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी ही आणीबाणी वाढवून आता ती २२ मार्चपर्यंत केली आहे. काल संध्याकाळी मालदीवमधील आणीबाणी संपुष्टात येणार होती मात्र आता ही आणीबाणी पुन्हा वाढवून २२ मार्चपर्यंत करण्यात आली आहे.
 
 
विरोधी पक्ष आणि खाजगी संस्था यांनी या आणीबाणीचा तीव्र विरोध केला असून नागरिकांनी देखील आता मालदीवमध्ये विरोध प्रदर्शन सुरु केले आहे. मालदीवमधील आणीबाणी लवकरात लवकर रद्द करण्यात यावी अशी मागणी भारताने देखील केली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे मालदीवमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
 
 
राजकीय अस्थिरतेमुळे ही आणीबाणी लागू करण्यात आली असून मालदीवचे राष्ट्रपती अब्दुला यामीन यांनी देशात ही आणीबाणी लागू केली होती. आणीबाणी लागू केल्यानंतर यामीन यांनी देशांतर्गत असलेल्या अनेक बड्या अधिकाऱ्यांना अटक करून तुरुंगात डांबले होते.
 
 
मालदीवमध्ये न्यायव्यवस्थासह लोकशाही संस्था संविधानाच्या अनुसार स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपणे तसेच पारदर्शक पद्धतीने कार्य करण्यास परवानगी देण्यात यावी तसेच १ फेब्रुवारी २०१८ ला मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश कार्यान्वित करावेत असे सध्या मालदीवमध्ये म्हटले जात आहे.
 
 
तसेच मालदीवमधील लोकतंत्र आणि न्यायव्यवस्था यांचे नियम परत दिले जावेत आणि नागरिकांच्या जीवनाचा विचार करण्यात यावा तसेच नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था प्रदान करण्यात यावी अशी मागणी देखील सध्या मालदीवमध्ये करण्यात आली आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@