पीएनबी घोटाळा : सीबीआयने केले जनरल मॅनेजरला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |

 
मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आणि संशयितांवर सीबीआयद्वारे कारवाई सत्र सुरु आहे, त्यामालिकेत सीबीआयने या घोटाळ्यात सामील असलेला बँकेचा जनरल मॅनेजरला अटक केली आहे. राजेश जिंदाल असे त्याचे नाव असून, २००९ ते २०११ या दरम्यान पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रेडी हाउस या शाखेचा मुख्य व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता.
 
 
सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी ब्रेडी हाउस शाखेला सीबीआयद्वारे टाळे ठोकले गेले. त्याचबरोबर या प्रकरणाशी संबंधित असलेल्या ६ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या शाखेचे पूर्वीचे सह व्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याचे देखील सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्यावर तपास सुरु आहे.
 
 
११ हजार ४०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्याशी संबंधित निरव मोदीचा मुख्य आर्थिक सल्लागार विपुल अंबानी याला देखील अटक केली आहे. विपुल अंबानी या प्रकरणात सुरुवाती पासून संशयाच्या टोकावर होता. सीबीआयच्या तपास कामात पूर्णपणे सहकार्य न करण्याची त्याची भूमिका या अटकेचे मुख्य कारण बनली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@