मॅग्नेटिक महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा आकडा फसवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |




गुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढण्याची काँग्रेसची मागणी


मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतील गुंतवणुकीचा आकडा हा फसवा आहे. राज्यातील गुंतवणुकीचे खरे चित्र दाखवण्यासाठी राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. बुधवारी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील गुंवणूक वाढवण्यासाठी राज्यसरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, आपले राज्य पथेटिक झाल्याची टिका चव्हाण यांनी यावेळी केली. एकीकडे मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, तर दुसरीकडे खोटी आकडेवारी आणि फसव्या घोषणा राज्य सरकारकडून करण्यात येतात, असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.
... हा तर मिस्टर इंडिया
मॅग्नेटिक महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे हायपरलूप. परंतु हा प्रकल्प म्हणजे मिस्टर इंडिया असल्याची टिका चव्हाण यांनी केली. या प्रकल्पाच्या नियोजन कसे करणार किंवा या प्रकल्पासाठी पैसा कुठून आणणार हे प्रश्न अद्याप अनुत्तरीच असल्याचे ते म्हणाले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@