बारावीच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला आठ विद्यार्थी डिबारभुसावळचे पाच, जळगावचे दोन आणि पारोळ्याचा एक विद्यार्थ्यांचा समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |
  

बारावीच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला आठ विद्यार्थी डिबार
भुसावळचे पाच, जळगावचे दोन आणि पारोळ्याचा एक विद्यार्थ्यांचा समावेश

 
जळगाव-  २१ फेब्रुवारी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक शालांत परीक्षा (एचएससी) ची वार्षिक परीक्षा बुधवार २१ फेब्रुवारी पासून सुरु झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला भुसावळचे पाच, जळगावचे दोन आणि पारोळ्याचा एक विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याने त्यांना डिबार करण्यात आले.
कॉपीमुक्त जळगाव जिल्हा ही संकल्पना राबवून जिल्हा कॉपीमुक्त करायचा मानस जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचा आहे. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी कठोर पाऊले उचलली आहेत. बारावीचे जिल्ह्यात एकूण ५१ हजार ३०८ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षार्थी आहेत. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाची परिक्षा घेण्यात आली. त्यात जिल्ह्यातील ८ विद्यार्थी डीबार झाले आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी परिक्षेला डीबारचे ग्रहण लागले आहे. डीबार झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शहरातील नुतन मराठा महाविद्यालयातील दोन, पारोळा येथील किसान महाविद्यालातील एक, भुसावळ येथील डी.एस.हायस्कुलचे चार, श्री संत गाडगेबाबा विद्यालयाच्या एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नुतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर जि.प.चे मुख्य कायकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पारोळ्याच्या किसान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, भुसावळ येथील दोन्ही विद्यालयातील विद्यार्थ्यांवर डायटचे प्राचार्य गजानन पाटील यांनी कारवाई केली. पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला डिबारचे ग्रहण लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@