अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्याची काँग्रेसची रणनीती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2018
Total Views |




अनेक मुद्दे लावून धरण्याच्या बैठकीत सुचना

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली असून मंगळवारी या संदर्भात काँग्रेस विधीमंडळ समन्वय समितीची विधानभवनातील काँग्रेस विधीमंडळ पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. राज्यात भेडसावणाऱ्या समस्या, संभाव्य मुद्दे आणि सरकारचे अपयश याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच अधिवेशनातील रणनीतीवरदेखील यावेळी चर्चा झाली.

यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, प्रतोद आ. संजय दत्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेतील गटनेते आ. शरद रणपिसे, आ. वर्षा गायकवाड, आ. भाई जगताप, आ. नसीम खान, आ.प्रा. वीरेंद्र जगताप उपस्थित होते. कर्जमाफी, बोंडअळी आणि शेतकऱ्याना झालेल्या नुकसानाची भरपाई न मिळणे, शेतीमालाचा हमीभाव, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शिक्षण, शहरी भागातील वाढत्या समस्या, सरकारडून सातत्याने होणारे इव्हेंट आदी. विषय लावून धरून सरकारला घेरण्याची रणनीती यावेळी ठरवण्यात आली. तसेच रविवारी सकाळी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अंतिम रणनिती ठरवण्यात येणार असल्याचे विखे-पाटील म्हणाले.

पंतप्रधान अर्थमंत्र्यांवर नाराज
नीरव मोदी याच्या पीएनबीतील घोटाळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर नाराज असून ते अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णयही घेऊ शकतात असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@