स्वामी रामदेवजी महाराज यांच्या उपस्थितीत योग शिबिरास प्रारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2018
Total Views |
 
 
 
योगाच्या माध्यमातून निरामय आरोग्यासह राष्ट्रभक्तीचा संदेश - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरातील कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर तीन दिवसीय योग चिकित्सा व ध्यान शिबिराला आज सकाळी ५ वाजता प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या शिबिराचे उदघाटन आज रामदेव बाबा यांनी केले. 
 
 
 
चंद्रपूर जिल्हा हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत असताना ह्या जिल्ह्यात आम्ही उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील नागरिक निरोगी राहावे यासाठी आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे . योगाच्या माध्यमातून निरामय आरोग्यासह राष्ट्रभक्तीचा संदेश सुद्धा मिळतो , असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
यावेळी पतंजली योग समितीचे  विष्णू भुतडा यांनी योगाचे महत्व विशद केले. त्यानंतर स्वामी रामदेवजी महाराज यांनी उपस्थित विशाल जनसमुदायास योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. नागरिकांनी देखील योगासने केलीत. या योग शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
 
 
आज सायंकाळी विशाल शेतकरी मेळावा
आज सायंकाळी याच क्रीडांगणावर स्वामी रामदेवजी महाराज यांच्या उपस्थितीत विशाल शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला असून या  मेळाव्याला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले 
 
 
@@AUTHORINFO_V1@@