इंटरनेटच्या वापरामुळे नागरिकांचा वजन कमी करण्याकडे वाढतोय कल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून लठ्ठपणाचा आरोग्यावर होणार्‍या गंभीर परिणामांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्यामुळे वजन कमी करण्याकडे त्यांचा कल वाढू लागला आहे. भारतीय इंटरनेट व मोबाईल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये मोबाईलवर इंटरनेटचा वापर करण्यात शहरामध्ये ५१ टक्के तर; ग्रामीण भागामध्ये १६ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
मोबाईलवर इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे आरोग्यविषयक जागरूकता वाढीस लागल्याचे निरीक्षण मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलने नोंदविले आहे. याविषयी अधिक माहिती देताना वोक्हार्ट रूग्णालयाचे बेरिएट्रिक व मेटाबोलिक सर्जन डॉ. रमण गोयल म्हणाले की, ’’गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील नागरिकांमध्ये वाढलेल्या वजनाविषयी चांगल्या प्रकारे जागरूकता आली आहे. मोबाईलवर आरोग्यविषयक असलेल्या अॅप्समुळे अनेक नागरिकांना स्वतःच्या अथवा आपल्या कुटुंबीयांच्या वजनाविषयी काळजी वाटू लागली आहे. भारतामध्ये मोबाईल व इंटरनेट यामध्ये क्रांती आल्यामुळे घरबसल्या अनेक गोष्टी वाचायला व पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते उच्च वर्गीय नागरिक वजन कमी करण्याला प्राधान्य देत आहेत.
 
’’हृदयविकार झालेल्या रूग्णामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली असते परंतु हृदयविकाराविषयी माहिती सहज उपलब्ध झाल्यामुळे आता हेच रूग्ण आपल्या आरोग्याविषयी सतर्क झालेले दिसतात, परंतु वाचलेली सर्वच माहिती ही सरसकट प्रत्येक रूग्णांना लागू होत नाही.
 
डॉ. पवन कुमार, हृदयशल्यविशारद, लीलावती रूग्णालय
 
@@AUTHORINFO_V1@@