राज्य शासनातर्फे रतन टाटा यांना महाउद्योग रत्न पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2018
Total Views |

गौतम सिंघानिया यांना महाउद्योग श्री पुरस्कार प्रदान

 
 
 
मुंबई : जगातल्या सातही खंडात आपल्या उद्योगाचा विस्तार असणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना राज्य शासनाच्या वतीने आज ‘महा उद्योग रत्न पुरस्कार’ तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे उद्योग जगतामध्ये रेमंड समूहाचे नाव उंचावताना भारतीय उद्योगांच्या नावाचा दबदबा जागतिक स्तरावर निर्माण करणाऱ्या गौतम सिंघानिया यांना ‘महा उद्योग श्री पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कारांची सुरुवात यावर्षीपासून करण्यात आली असून या दोन्ही उद्योग रत्नांचा गौरव हा राज्याचा गौरव आहे अशी भावना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
 
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्‌व्हर्जन्स-201८’ च्या बीकेसी मैदानावर आयोजित कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, मुख्य सचिव सुमित मलिक, अतिरिक्त मुख्य सचिव उद्योग सुनील पोरवाल, उद्योग आयुक्त हर्षदीप कांबळे यांचेसह उद्योग, राजकीय, प्रशासन यासह विविध क्षेत्रातील देश विदेशातील मान्यवर व नागरीकांची मोठी उपस्थिती होती.
 
कार्यक्रमामध्ये पुरस्काराने सन्मानित झालेल्या राज्याच्या उद्योग क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान, रसायन, कापड, वाहन, संरक्षण , कृषी आदी क्षेत्रातील मोठे, मध्यम, लघु उद्योग एमएसएमई, स्टार्ट अप उद्योग, व्यवसायामधील विभागनिहाय व्यक्ती, महिला, युवकांचा सन्मान झालेल्यांमध्ये समावेश होता.
 
@@AUTHORINFO_V1@@