खाद्यपदार्थ विक्रेते गिरविणार स्वच्छतेचे धडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2018
Total Views |
 
 
 
मुंबई : मुंबईमध्ये स्ट्रीट फूडच्या नावाखाली विक्री करण्यात येणार्‍या विविध खाद्यपदार्थांच्या दर्जाचा सहसा विचार न करताच त्यावर ताव मारला जातो. स्वच्छतेच्या नियमांची अंमलबजावणी न करता, तसेच खाद्यपदार्थांचा दर्जाचा विचार न करता काही ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले जातात, परंतु ही बाब आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने आता अन्न व औषध प्रशासन खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी एफडीए कारवाई करण्याची मोहीम हाती घेणार आहे.
 
रस्त्यावर लावण्यात येणार्‍या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एफडीएच्या खाद्य विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, ’’मुंबईमध्ये १५-२० दिवस हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये स्टॉल्सधारकांना स्वच्छतेचे धडे देण्यात येणार आहेत. त्याबाबत त्यांच्यामध्ये जनजागृती, स्वच्छतेचे महत्त्व, ती कशी ठेवायची याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता कशी सुधारता येईल याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुंबईनंतर ठाणे आणि नवी मुंबईमध्ये ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
 
एफडीएने यासाठी एक विशेष व्हॅन तयार केली आहे. प्रशिक्षण देणार्‍या कर्मचार्‍यांना यासंदर्भातले सध्या एक प्रशिक्षण दिले जात आहे. या व्हॅनमध्ये प्रोजेक्टरसोबत अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. व्हॅनमध्ये लावण्यात येणार्‍या प्रोजेक्टरवर खाद्यपदार्थ बनविताना कोणती सावधगिरी बाळगावी यासंदर्भात मार्गदर्शन करणारे व्हिडिओ दाखविण्यात येणार आहेत. एफडीएचे अधिकारी जवळपास ९९ स्टॉल्सला प्रशिक्षण देणार आहे. मुंबईतील रेल्वे स्थानके, बस स्थानके, रुग्णालये, पर्यटन स्थळ, महाविद्यालय यासारख्या परिसरांमध्ये लावण्यात येणार्‍या स्टॉल्सधारकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@