चंद्रकांत मोरेंना ‘क्रांतिदूत’ पुरस्कार प्रदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2018
Total Views |
 
 

 
 
नाशिक : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या १२ व्या अधिवेशनांतर्गत पुण्यामध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरचे व्यवस्थापक आ. चंद्रकांत मोरे यांना ‘क्रांतिदूत’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधरबाबा शिंगोटे, शासकीय अधिकारी विजय देशमुख यांचा ही या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, ना. दिवाकर रावते, पत्रकार संघाचे राजा माने, संजय भोकरे, वसंत मुंढे, विश्वास आरोटे व्यासपीठावर उपस्थित होते.
 
“देशात व देशाबाहेर पाच हजारपेक्षा जास्त केंद्राच्या माध्यमातून आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत विविध समाजोपयोगी व राष्ट्रभक्ती वृद्धिंगत करणारे उपक्रम वर्षभर सातत्याने राबवित असतात. या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने चंद्रकांतदादांना ‘क्रांतिदूत’ पुरस्कार देऊन गौरविले आहे.
 
भोसरी (पुणे) येथील रामस्मृती लॉन्समध्ये झालेल्या अत्यंत दिमाखदार सोहळ्यात चंद्रकांत मोरे उपस्थितांबरोबर संवाद साधताना म्हणाले, “कर्मकांड, अंधश्रद्धा दूर सारून खरं अध्यात्म जनतेला समजावून सांगण्याचे व त्यांच्या जीवनातील दु:खाचा अंधकार दूर करून आनंद प्रकाश निर्माण करण्याचे काम सेवामार्ग करीत आहे. हा पुरस्कार गुरुमाऊलींना, सेवामार्गाला व प्रत्येक सेवेकर्‍याला मिळालेला आहे. माध्यमांनी नकारात्मक गोष्टींचा मारा समाजावर करण्याऐवजी सकारात्मक बाबी समाजासमोर मांडून सकारात्मक समाजाची निर्मिती करण्याचे अभियान हाती घ्यावे. मराठी पत्रकारितेला महान परंपरा असून ती वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, असे आव्हान राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या प्रसंगी केले.
@@AUTHORINFO_V1@@