इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत मॅरीकॉमची सुवर्ण कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2018
Total Views |
 
 
 
नवी दिल्ली : भारताची प्रसिद्ध बॉक्सर एम. सी. मॅरी कॉमने इंडियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. मॅरी कॉमने ४८ किलो वजन गटाच्या अंतिम लढतीमध्ये फिलिपाईन्सच्या जोसी गाबुको हिचा ४-१ असा पराभव करत सुवर्ण पदावर आपले नाव कोरले आहे. मॅरी कॉमसह संजीत, मनिष कौशिक, पी. बासुमातर, लव्हलीना बोर्गाहेन आणि पिंकी राणी हिला देखील सुवर्ण पदक मिळाले आहे.
 
 
 
 
 
पुरुष गटात संजितने ९१ किलो गटामध्ये उजबेकिस्तानच्या संजार तुर्सुनोव्हवर विजय मिळविला. तर शिव थापाला पराभूत करणाऱ्या मनीषने अंतिम फेरीत न खेळताही सुवर्णपदक जिंकले. मनीषचा प्रतिस्पर्धी बाट्टूमूर मिशील्ट जखमी असल्याने अंतिम सामना खेळू शकला नाही.
 
 
 
 
 
याआधी पिलाओ बसुमतारी हिने ६४ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले. तिने माजी विश्व आणि आशियाई कांस्य पदकप्राप्त थायलंडच्या सुदापोर्न सीसोंदी हिचा ३-२ असा पराभव केला. बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने वेल्टरवेट ६९ किलो वजन गटात पूजाला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. एल. सरिता हिला ६० किलो वजन गटाच्या अंतिम सामन्यात फिनलँडच्या ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या मीरा पोटकेनोने पराभूत केले. यामुळे सरिताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
@@AUTHORINFO_V1@@