सुषमा स्वराज यांची नेपाळ दौऱ्यात अनेक नेत्यांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
नेपाळ: केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ३१ जानेवारीपासून नेपाळ राष्ट्राच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. या दौऱ्यात सुषमा स्वराज यांनी नेपाळमधील अनेक दिग्गज नेत्याची भेट घेतली असून त्यांच्यासोबत चर्चा केली. भारत आणि नेपाळ या दोन देशांचे संबंध अजून घट्ट व्हावे या उद्देशाने हा दौरा आखण्यात आला आहे.
 
 
 
 
 
 
या दौऱ्यात सुषमा स्वराज यांनी सगळ्यात आधी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांची काठमांडू येथे भेट घेतली. यानंतर स्वराज यांनी नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांसोबत यावेळी त्यांनी भारत आणि नेपाळच्या सध्याच्या संबंधावर चर्चा केली तसेच दोन्ही देशांचे संबंध अजून मजबूत कसे होतील यावर विचारविमर्श केले.
 
 
 
 
 
 
तसेच या दौऱ्यात स्वराज यांनी संघीय समाजवादी फोरमचे अध्यक्ष उपेंद्र यादव आणि सीपीएनचे प्रमुख आणि नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल यांची भेट घेतली. तसेच अनेक नेत्यांची आणि दिग्गज लोकांची त्यांनी या दौऱ्यात भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली असून दोन्ही देशांसमोर असलेल्या समस्या आणि त्यांचे निवारण याविषयी चर्चा करण्यात आली. 
 
@@AUTHORINFO_V1@@