लोकनेते दत्ताजी पाटील स्मृतिदिनी रक्तदान शिबीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त नाशिक ब्लड बँक व लासलगाव डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रक्तदान शिबीर व मोफत थायरॉईड व थॅलेसेमिया तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबिरात सुमारे ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात महिलांचाही सहभाग मोठा होता.
 
प्रारंभी लोकनेते दत्ताजी पाटील पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रकाश गांगुर्डे नाशिक ब्लड बँकेचे डॉ. गिरीश वैद्य, डॉ. श्रीनिवास दायमा, डॉ. उषा बंदछोडे डॉ. कैलास पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, संजय पाटील, जगदीश पाटील, शंतनू पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
 
डॉ. उषा बंदछोडे, डॉ. श्रीनिवास दायमा यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश गांगुर्डे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश दरेकर, डॉ. अनिल बोराडे, राजेंद्र कुंदे, डॉ.अशोक महाले, डॉ.भाऊसाहेब रायते, डॉ.अरुण काळे, प्रा.डॉ. विलास खैरनार, प्रा. भूषण हे उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@