आदिवासी मुलांना मिळणार नेतृत्व विकासाचे धडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2018
Total Views |

रोटरी क्लब ऑफ नाशिक, मुक्त विद्यापीठाचा पुढाकार

 

 
 
नाशिक :  गुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यातील नेतृत्त्व गुणांनाही प्रोत्साहित करणे, त्यांच्यातील कौशल्ये आणि कलागुणांचा विकास साधण्यासाठी दि. २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान ‘रायला २०१८’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होणार्‍या या तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे करण्यात आले आहे.
 
 
‘रायला’ २०१८ हा रोटरी इंटरनॅशनलने तयार केलेला कार्यक्रम युवा पिढीतील सुप्तगुणांना वाव देणारा आहे. यात युवापिढीला वेगवेगळ्या कौशल्यांच्या व कलागुणांचा वापर वैयक्तिक जीवनात करून, प्रगती करण्यासाठीचे तंत्र व मंत्र शिकवले जातात. त्यांच्यातील नेतृत्त्व गुणांनाही प्रोत्साहित केले जाते. या शिबिरासाठी १६ ते २२ वयोगटातील युवक-युवतींचा समावेश करण्यात आला आहे. या तीन दिवसांच्या शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्त्व, संवाद कौशल्य, भावी व्यवसाय योजना, मुलाखत कौशल्य, संघटन कौशल्य, वाद-विवाद स्पर्धा याबरोबरच बौद्धिक प्रेरक खेळही घेतले जाणार आहेत. या शिबिरात नाशिक जिल्ह्यातील वाघेरा, धोंडेगाव आणि डांगसौंदाणे येथील आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता नववी ते अकरावीच्या वर्गातील ४० मुले व मुली तसेच मुक्त विद्यापीठाच्या बी.एस्सी. आणि बीबीएचे २० असे एकूण १०० युवक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे शिबिरासाठी येणारा सर्व खर्च रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या सदस्यांनी उचलला आहे.
 
विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात होणार्‍या कार्यक्रमाचे उद्घाटन मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ पत्रकार तथा ख्यातनाम साहित्यिक उत्तम कांबळे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. धावपटू कविता राऊत हिलाही या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय तंबाखू विरोधी मोहिमेसंदर्भात डॉ. नागेश मदनूरकर, शारीरिक आरोग्याच्या समस्या व स्वच्छतेबाबत डॉ. श्रिया कुलकर्णी मार्गदर्शन करणार असून फ्लॉवर डेकोरेशनचे प्रात्यक्षिकही सचिन ब्राह्मणकर यावेळी मुलांना देणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाची घ्यावयाची दक्षता आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात ‘जीवन संजीवनी’ यावर डॉ. अनिता नेहेते मार्गदर्शन करतील.
 
@@AUTHORINFO_V1@@