इंडिया ओपेन: पी.व्ही. सिंधूने गाठली उपांत्य फेरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
नवी दिल्ली: नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या इंडिया ओपेन स्पर्धेत भारताची स्टार पी. व्ही. सिंधू हिने स्पेनच्या बीट्रिज कोर्रलेस हिला मागे टाकत या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. बीट्रिज कोर्रलेस ही जागतिक स्तरावर ३६ व्या क्रमांकावर असणारी खेळाडू आहे आणि हिला सिंधूने मात दिली असल्याने ही भारतासाठी मोठी बाब मानली जात आहे.
 
 
इंडिया ओपेन या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधू हिने महिला वर्गात बीट्रिज कोर्रलेस हिला २१-१२, १९-२१ आणि २१-११ अशा गुणांनी मागे टाकत ही फेरी आपल्या नावावर करून घेतली. पहिल्या फेरीत सिंधू हिने आक्रमक खेळी दाखवत २१-१२ अशा गुणांची कमाई केली. मात्र दुसऱ्या फेरीत बीट्रिज कोर्रलेस ही सिंधूवर भारी पडली.
 
 
दुसऱ्या फेरीत १९-२१ अशा गुणांनी बीट्रिज कोर्रलेस हिने गुण मिळवत सामन्यात बरोबरी केली. त्यामुळे तिसऱ्या फेरीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र या फेरीत सिंधू हिने २१-१२ अशा गुणांनी बीट्रिज कोर्रलेसवर मात करत या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. हा सामना अतिशय अतितटीचा झाला नसला तरी देखील दुसऱ्या फेरीत बीट्रिज कोर्रलेस हिने जास्त गुण मिळविले असल्याने तिसरी फेरी कोण जिंकत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 
 
 
 
मात्र शेवटी सिंधूने मोठ्या फरकाने हा सामना स्वत:च्या नावावर करून घेतला आणि भारताला उपांत्य फेरीत जागा मिळवून दिली. 
 
@@AUTHORINFO_V1@@