महिला उद्योजकांना प्रोत्साहनपर पुरस्कार योजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2018
Total Views |
 
 
 
भंडारा: महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे दृष्टीने व यशस्वी उद्योजकांनी आपल्या उद्योगात केलेल्या प्रगतीला चालना देवून त्यांचा गौरव करण्यासाठी रोख पुरसकार देण्याची तरतूद महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण २०१७ च्या शासन निर्णयानुसार केली आहे. त्याअंतर्गत सन २०१८ या वर्षात पुरस्कारासाठी ३ फेब्रुवारी २०१८ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. 
 
इच्छुक लघु उद्योग घटकांनी जिल्हा उद्योग केंद्र भंडारा येथे संपर्क साधून विहित अर्जाचा नमुना प्राप्त करुन परिपूर्ण भरुन सादर करावा, असे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी कळविले आहे. बक्षिसाचे स्वरुप महाराष्ट्र कन्वर्हजन्स समिट कार्यक्रमामध्ये निवडक महिला उद्याजकांना पुरस्कार स्वरुप प्रशस्तीपत्र देण्यात येईल. 
 
 
या योजनेंतर्गत ज्या महिला उद्योग घटकांचे कमीत कमी मागील ३ वर्षाच्या कालावधीपूर्वी स्थायीरित्या लघु उद्योग म्हणून नोंद झालेली आहे. सन २०१८ च्या पुरस्कारास १ जानेवारी २०१४ किंवा त्यापूर्वी स्थायीरित्या लघु उद्योग नोंदणी झालेले उद्योग घटक असावे. मागील २ वर्षात सलग उत्पादन करीत असलेले उद्योग घटक, यापूर्वी देश, राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेला नाही असे उद्योग घटक पात्र, घटक कोणत्याही वित्तीय संस्था अथवा बँकेचा थकबाकीदार नासावा. मागासवर्गीय उद्योजकांना या योजनेत विशेष प्राधान्य देण्यात येईल. 
 
@@AUTHORINFO_V1@@