कांद्याचे दर घसरल्याने नाराजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : किमान निमी केल्यार्यातमूल्य कनंतरही अपेक्षित निर्यात न वाढल्याने व मोठी आवक झाल्याने बुधवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात कमाल ५००, तर सरासरी ३०० रुपयांची घसरण झाली.
 
लाल कांद्याची ६०० वाहनांतून आवक झाली. बाजारभाव प्रतिक्विंटल किमान ९५०, कमाल १,९०५ तर सरासरी १,६५० रुपये होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १,२०० रुपयांची घसरण झाली. कांदा क्विंटलमागे दोन हजार रुपयांच्या आत आल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ८५ हजार ५४४ क्विंटल आवक होऊन किमान भाव एक हजार तर कमाल भाव ३,१५८ रुपये होते.
 

इतर राज्यांतून कांद्याची आवक
 
आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये पुन्हा घसरण दिसून आली. दोन दिवसांमध्ये कांदा दरात १४०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दररोज दोन लाख ते अडीच लाख क्विंटलची आवक होत आहे, तर पुणे व गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून कांद्याची मोठी आवक येत आहे. त्यामुळे नाशिकमधून मागणी कमी झाल्याने ही घसरण होत आहे, तर निर्यातमूल्य ७०० डॉलर असल्यामुळे निर्यातीवर परिणाम झाल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये सोमवारच्या तुलनेत ५०० रुपयांची तर मागील आठवड्याच्या तुलनेत १४०० रुपयांची प्रति क्विंटल मागे घसरण झाली आहे. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची १६ हजार ८०० क्विंटल आवक होऊन लाल कांद्याला जास्तीत जास्त १७५१ रुपये, सरासरी १५०० रुपये तर कमीतकमी ६०१ प्रति क्विंटलला भाव मिळाला. कांद्यावरील निर्यात मूल्य दर हे ७०० डॉलर असल्याने देशातील निर्यातीला फटका बसला आहे. निर्यात मूल्य कमी न केल्यास अजून कांदा दरात घसरण होण्याची शक्यता आहे. सध्या कोलंबो वगळता कुठेही निर्यात नाही. यामुळे शेतकर्‍यांना मोठी आर्थिक झळ बसत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@