जगभरातील प्राचीन संस्कृतीत स्त्रियांना दिलेले देवत्वाचे स्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2018
Total Views |

अग्निपूजा, शोभायात्रेने चार दिवसीय जागतिक परिषदेला केशवसृष्टीत सुरुवात
सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, पद्मविभूषण डॉ. सोनल मानसिंग, पद्मविभूषण वेदप्रकाश नंदा यांची प्रमुख उपस्थिती
 
 
 

भाईंदर : इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजतर्फे (आयसीसीएस) आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या त्रैवार्षिक जागतिक परिषद आणि एकत्रीकरणाचे आज उद्घाटन करण्यात आले. जगभरातील विविध प्राचीन संस्कृतीतील विद्वान, मान्यवरांनी सकाळी अग्निपूजा करून या परिषदेची सुरुवात केली. यावेळी शोभायात्रेचेही आयोजन करण्यात आले होते. मुंबईजवळील उत्तन येथील केशवसृष्टी प्रकल्पामध्ये दि. १ ते ४ फेब्रुवारीदरम्यान ही परिषद सुरू राहणार आहे. परिषदेच्या उद्घाटनाचे सत्र केशवसृष्टीतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये पार पडले. यावेळी व्यासपीठावर रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, पद्मविभूषण वेदप्रकाश नंदा, पद्मविभूषण डॉ. सोनल मानसिंग उपस्थित होते.
 
जगभरात अनेकानेक प्राचीन संस्कृती अस्तित्वात होत्या आणि आहेत, पण कित्येक संस्कृतीतील नागरिकांनी आज त्यांची मूळ ओळख विसरली आहे. जगातील विविध देशांतील प्राचीन संस्कृतींना मानणार्‍या लोकांचे, विद्वानांचे, धर्मगुरूंचे, संतांचे एकत्रीकरण करून त्या माध्यमातून त्या त्या संस्कृतींचे पुनरुज्जीवन व्हावे, जगाला त्याची ओळख व्हावी आणि या सर्वच संस्कृतीत जे काही समान धागे आहेत, त्यायोगे आजच्या माणसाने जवळ यावे, सर्वांनी एकमेकांना बंधुभगिनी मानावे या उद्देशाने केशवसृष्टी येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दर तीन वर्षांनी होणार्‍या या परिषदेची यंदाची संकल्पना प्राचीन संस्कृतीत स्त्रियांना जे देवत्वाचे, पूजनीय स्थान देण्यात आले आहे, त्याची माहिती करून घेणे ही आहे.
 
प्राचीन काळातील सर्वच संस्कृतीत पृथ्वीला माता मानण्याची समान संकल्पना आहे. गुरुजनांचा सन्मान करणे आणि पूर्वजांप्रति श्रद्धाभाव बाळगणे, सर्व सृष्टीमध्ये देवत्व भरलेले आहे, सर्व जगातील मनुष्य, प्राणी, झाडे, जीवजंतू आपले नातेवाईक आहेत, असे सर्वच संस्कृतींनी सांगितले आहे. याच मुद्द्यांआधारे आयसीसीएस हे एकत्रीकरणाचे कार्य करत आहे.
 
आयसीसीएसद्वारे आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या परिषदेमध्ये ३१ देशांतील २५० पेक्षा जास्त जागतिक स्तरावरील निरनिराळ्या संस्कृतीतील मान्यवरांचे, विद्वानांचे आगमन झाले आहे. या सर्व अभ्यागतांचे यावेळी आकर्षक रांगोळ्या आणि स्त्रियांच्या हातावर मेहंदी काढून स्वागत करण्यात आले. परिषदेतील चारही दिवसांत जगातील निरनिराळ्या संस्कृतीतील प्राचीन विधी, वेशभूषा, खानपान यांची ओळख होणार आहे. आज ‘स्वेट लॉज’ हा एक अनोखा कार्यक्रमही या परिषदेत करण्यात आला. यामध्ये अग्नीमध्ये गरम केलेल्या दगडावर पाणी टाकले जाते व त्यातून निघणारी वाफ शरीरावर घेतात. यामुळे मोठ्या प्रमाणात घाम येतो व शरीर शुद्ध होते, असे मानतात. हा दक्षिण अमेरिकेतील प्राचीन संस्कृतीतील प्रकार आहे.
 
हिंदू संस्कृतीने स्त्रियांना नेहमीच पूजनीय मानले
 
हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रियांना सदैव पूजनीय आणि वंदनीय मानले आहे. हजारो वर्षांपासून स्त्री रूपातील देवतांची भारतात उपासना केली जाते. आमच्या ऋषीमुनींनी, ग्रंथांनी स्त्रीला नेहमीच शक्तीरूपात पाहिले. स्त्रीमुळेच सृजन-सृष्टीनिर्मिती शक्य आहे. त्यामुळे स्त्रीशक्ती आमच्यासाठी आराध्यच राहणार आहे.
 
- दत्तात्रय होसबाळे, सहसरकार्यवाह. रा. स्व. संघ

स्त्रिशिवाय त्रिदेवही अपूर्ण
 
भारतीय संस्कृतीत स्त्रीची सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती ही तीन प्रमुख रूपे मानली जातात. सरस्वती म्हणजेच विद्या, बुद्धीमत्ता, ज्ञान होय. लक्ष्मी म्हणजेच संपत्ती, पैसा होय. पार्वती म्हणजेच शक्ती. सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती ही तीन जगज्जननीचीच रूपे आहेत आणि ब्रह्मा, विष्णू, महेश हे या तिन्हींचे पती आहेत, जे श्री म्हणजे स्री शक्तीशिवाय अपूर्ण आहेत. भगवान शंकराचे अर्धनारीनटेश्वराचे रूप भारतात पूजले जाते. यातून स्त्री आणि पुरुष दोघेही समानच असल्याचे सांगितले आहे.
 
- डॉ. सोनल मानसिंग, पद्मविभूषण नृत्यांगना
 
@@AUTHORINFO_V1@@