मोफत रोगनिदान व उपचार शिबीरात ३३६ रुग्णांची तपासणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2018
Total Views |
 
 
भंडारा :  सार्वजनिक आरोग्य विभाग व आयुष कार्यक्रम भंडारा यांच्या मार्फत मोफत रोगनिदान व उपचार शिबीराचे जिल्हा रुग्णालयात आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उदघाटन अतिरिक्त जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर चाचरकर, डॉ. चंचल खोब्रागडे, डॉ. भाष्कर खेडीकर, डॉ. जया कळमकर, डॉ. संगिता देशमुख उपस्थित होते.
 
 
डॉ.सुनिता बढे यांनी मार्गदर्शन करतांना या शिबीराचा उद्देश जनतेला आयुष बद्दल माहिती देणे व जुनाट आजारांकरीता आयुष पध्दतीचा यशस्वी वापर करण्यात प्रोत्साहन देणे आहे. तरी जनतेने सदर शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. डॉ. प्राची पातुरकर यांनी प्रास्ताविकात आयुष बद्दल माहिती दिली. शिबीरात दुखणे, मधुमेह, आम्लपित्त यावर आयुवेद, चर्मरोग, श्वसन विकार, मुतखडा यावर होमिओपॅथी तसेच स्त्रीरोग व पचन विकास यावर युनानी पध्दतीने उपचार करण्यात येईल असे सांगितले. रुग्णांना योग व निसर्गउपचार चिकित्सा पध्दतीचा सल्ला दिला.
 
 
 
५  फेब्रुवारी रोजी सुध्दा या शिबीराचे आयोजन येथेच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर शिबीरात एकूण ३३६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात १०१  आयुर्वेद, १३० होमिओपॅथी, ६५  युनानी व ४० योग व निसर्गउपचार पध्दतीचा उपचार देण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन मनिषा लांजेवार यांनी तर आभार माधुरी ठोंबरे यांनी मानले.  
 
@@AUTHORINFO_V1@@