शिवजयंतीनिमित्त शिरपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मानवंदना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 

 शिवजयंतीनिमित्त शिरपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मानवंदना


शिरपूर -

छत्रपती  शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बाबुराव वैद्य मार्केट ते पाचकंदील चौकापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पथसंचलन करून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. या संचलनात संघाचा घोष पथक आणि रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांची शिस्त आकर्ष ठरले. यावेळी अनेक नागरिक संघाचे पथ संचलन बघण्यासाठी मोठी संख्येने उपस्थित होते.

   सकाळी वाजता बाबुराव वैद्य मार्केटमध्ये संघ स्वयंसेवक आणि शिवप्रेमींचे एकत्रीकरण करण्यात आले होते. तिथून पथसंचलन पाचकंदील चौकात पोहचले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी अनेक स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. तर असंख्य शिवप्रेमीही कार्यक्रमाला उपस्थित होते.

या संचलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. तसेच सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाही देण्यात आल्या.  मानवंदना देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

 
@@AUTHORINFO_V1@@