भाजपसरकारकडून जनतेची घोर फसवणूकअमळनेरच्या हल्ला बोल सभेत राकॉ घणाघात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2018
Total Views |
 
 भाजपसरकारकडून जनतेची घोर फसवणूक
अमळनेरच्या हल्ला बोल सभेत राकॉ  घणाघात
जळगाव --
नेहमी ऑनलाईन असणार्‍या सरकारने जनतेची  फसवणूक केली असून ऑनलाईन असणार्‍या भाजपा सरकारकारला 2019 मध्ये ऑफ लाईन करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमळनेर हल्लाबोल सभेत घणाघाती हल्लाबोल केला .
अमळनेर येथे ग्लोबल स्कुल च्या प्रांगणात आयोजित हल्लाबोल सभेत केला यावेळी व्यासपीठावर खा सुप्रियाताई सुळे,मा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,जिल्ह्याध्यक्ष डॉ सतीश पाटील,मा आ गुलाबराव देवकर,राजीव देशमुख, दिलीप सोनवणे,महिला अध्यक्षा चित्राताई वाघ,गफ्फर मलिक,किरन शिंदे,संग्राम कोते, जयदेवराव गायकवाड,तिलोत्तमा पाटील अनिल भाईदास पाटील आदी उपस्थित होते सभेला तालुक्यातील हजारो कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
 ते पुढे म्हणाले की, कृषिप्रधान देशात तरुणांना रोजगार दिला जाईल हा शब्द हवेत विरला आहे.1 डिसेंबर 2017 मध्ये खा सुप्रिया सुळे यांनी 160 किमी पर्यंत नागपूर येथून पदयात्रा काढली त्यानंतर आता संपूर्ण राज्यात हल्लाबोल मोर्चे काढून सरकारचा निषेध नोंदविला जात आहे 2004 ते 2014 दरम्यान कोणताही शेतकर्‍यांना प्रश्‍न निर्माण झाला नाही ह्या राज्यात कुठलीही महिला सुरक्षित नाही धुळे जिल्ह्यातील 80 वर्षीय धर्मा पाटील यांना मंत्रालयात जावून आत्महत्या करावी लागते . साहेबराव अजित दादामार्फत माझ्याकडे येत असतांना मी त्यांना पाडळसरे धरणासाठी त्याकाळात शेकडो कोटी रुपये निधी दिला मात्र नगरपालिका निवडणुकीत अनिल पाटील यांना सगळा भार घेवून त्यांना निवडून दिले मात्र आज अनिल दादा त्याचा वचपा काढल्याशिवाय राहायचे नाही असे सूचित केले त्यावेळी त्यांनी अमळनेरचा वादा अनिलदादा महाराष्ट्राचा एकच वादा अजितदादा महाराष्ट्राची एकच ताई सुप्रियाताई अशा घोषणा वर्षभर सुरू ठेवून काम करीत रहा असे आवाहन युवकांना केले.
 
यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवर टिकाअस्त्र सोडले.खा.सुप्रिया सुळे यांनी भाजपावर हल्ला चढवितांना म्हणाल्या की, सरकारची कामे सांगण्यासाठी सर्व्यांत मोठे जाहिरात हे माध्यम असून ते फसवे आहे मुंबई येथील समुद्रात शिवाजी महाराज्यांच्या स्मारकाच्या उद्घाटन जाहिराती साठी 14 कोटी तर कार्यक्रमाला 5 कोटी खर्च केला गेला हेच 19 कोटी रुपये पाडळसरे धारणास दिले असते तर कामात आले असते.
 
@@AUTHORINFO_V1@@