अमेरिकेच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मुंबई : अमेरिकेचे भारतातील नवनियुक्त राजदूत केनेथ जस्टर यांनी राज्यपाल  विद्यासागर राव यांची सोमवारी राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. अमेरिका भारतासोबत संरक्षण, ऊर्जा, व्यापार यांसह अनेक विषयांवर सहकार्य करीत असून उभय देशांमधील संबंध अधिक दृढ तसेच व्यापक करण्यासाठी आपला देश प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
भारतातील अनेक विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असून अमेरिकेतील लोक देखील मोठ्या प्रमाणात भारताला भेट देत आहेत. आपण ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी आलो असून आपल्यासह अनेक अमेरिकन उद्योगांचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
नव्या राजदूतांचे महाराष्ट्रात स्वागत करताना अमेरिकेने महाराष्ट्रासोबत उच्च शिक्षण तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. संत्री, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी यांसह अनेक फळांच्या उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे सांगून अन्न प्रक्रिया क्षेत्रात देखील सहकार्याला मोठा वाव असल्याचे राज्यपालांनी सांगितले. राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत एडगर्ड कागन तसेच इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@