अपंग युनिट प्रकरणआठवड्याभरानंतरही गुन्हा दाखल नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2018
Total Views |

अपंग युनिट प्रकरण
आठवड्याभरानंतरही गुन्हा दाखल नाही

 
 
 
 
 
 
जळगाव-
बंद पडलेल्या अपंग युनिटमधील शिक्षकांचे समायोजन करून त्यांच्या बनावट नियुक्त्या देण्यात आल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हा परिषदेने 94 शिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर त्यांच्या स्वाक्षरीने गुन्हा दाखल करण्याबाबत शहर पोलीस ठाण्यात 12 फेबु्रवारी रोजी पत्र देण्यात आले मात्र आठवड्याभराचा कालावधी उलटून देखील अद्याप पर्यत गुन्हा दाखल झालेले नाही. खुद्द सीईओ गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे.
राज्यात बंद पडलेल्या अपंग युनिटमधील शिक्षक, परिचालकांचे समायोजन करून त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नियुक्त्या देण्याचे आदेश शासनाने सन 2010 मध्ये काढले होते. जळगाव जिल्हा परिषदेत मात्र 1 जानेवारी 2017 पर्यंत बनावट नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. आणखी नियुक्त्यांसाठी अर्ज येत असताना जळगाव जिल्हा परिषदेने शासनाकडे मूळ यादी मागितली होती. ही यादी प्राप्त झाल्यानंतर बनावट शिक्षकांच्या नियुक्त्यांचे रॅकेट उघड झाले. यात 181 शिक्षकांचे तर 8 शिपाई असे एकुण 189 कर्मचार्‍यांचे समायोजन करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सीईओ यांनी चौकशी समिती नियुक्त करून पहिल्या टप्प्यात 94 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. राज्यभरात 595 नियुक्त्यांचे आदेश असताना एकट्या जळगावमध्ये 274 नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.जळगावप्रमाणे पालघर, धुळे जिल्हा देखील बनावट नियुक्त्यांमध्ये आघाडीवर आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यातील बनावट नियुक्त्याप्रकरणी संबंधीतांवर गुन्हे दाखल झाले आहे. विशेष म्हणजे जळगावनंतर धुळे येथील प्रकरण उघडकीस आले होते. 
सुरुवातीला गणवेश घोटाळ्याचे प्रकरण समोर आले, त्यानंतर 2014 मध्ये पोषण आहार आणि आता अपंग युनिट प्रकरण समोर आले आहे. तीनही प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. मात्र गुन्हा दाखल होत नाही. शालेय पोषण आहार प्रकरणी 2014 पासून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. तीन वर्ष उलटूनही गुन्हे दाखल झाले नसल्याने पोलीस प्रशासनाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@