५ वर्षीय पिडीतेच्या नातेवाईकांचा पोलीस स्थानकावर मूक मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2018
Total Views |
 
 

दोंडाईचातील ५ वर्षीय पिडीतेच्या नातेवाईकांचा पोलीस स्थानकावर मूक मोर्चा


दोंडाईचा, १९ फेब्रुवारी

येथील पाच वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला कडक शिक्षेच्या मागणीसाठी पिडीतेच्या नातेवाईकांसह त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलीस स्थानकावर मूक मोर्चा काढला. यावेळी शहरातील महिलांची संख्या लक्षणीय होती.

८ फेब्रुवारी रोजी सिनिअर के.जी.ला शिकणाऱ्या या ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आला. अतिप्रसंग झाल्यावर रडत - रडत घरी येऊन पोट दुखत असल्याचे या बालिकेने आईला सांगितले. दवाखान्यात तपासणी केल्यावर डॉक्टरांनी या बालिकेची सोनोग्राफी करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पिडीतेच्या आईनी सोनोग्राफी केल्यावर या परिवाराने जळगावला येऊन जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून बालिकेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तपासाअंती हा गुन्हा दोंडाईचा पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला.

पिडीत बालिका शिक्षण घेत असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह शहरातील असंख्य नागरिकांनी दोंडाईचा पोलीस स्थानकात जाऊन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे निवेदनाचे पत्र देऊन या नराधमाला त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली.

नराधम शिक्षक महेंद्र पाटीलला अटक

दोंडाईचा येथील नुतन माध्यमिक विद्यालयात ५ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचारानंतर जळगावसह दोंडाईचा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपासालाही गतीमिळाली. अतिप्रसंग करणाऱ्या महेंद्र आधार पाटील या शिक्षकाला पोलिसांनी अटक केल्यानंतर तपास वेगाने सुरू असल्याची माहिती दोंडाईचा पोलिसांनी दिली.


 
@@AUTHORINFO_V1@@