निर्यात धोरण हे देशाचे ग्रोथ इंजिन ठरेल - सुरेश प्रभू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
मुंबई : देशाचे निर्यात धोरण हे देशाच्या प्रगतीसाठी ग्रोथ इंजिन ठरेल, यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न आणि केलेल्या उपाययोजनांना जागतिक पातळीवरुन चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केले.
 
मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स २०१८ या आंतराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेमध्ये एक्स्पोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्रिलायझेशन या परिसंवादात मार्गदर्शन करताना प्रभू बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातील महासंचालक अजय सहाय, अतिरिक्त महासंचालक सोनिया सेठी, केपीएमजीचे अध्यक्ष अरुण कुमार, निर्यातदार पी.पांड्या, उद्योजक गोपाळ पिल्लई, जय श्रोफ, ए.बी. रवि आदी उपस्थित होते.
 
 
केंद्रीय मंत्री प्रभू यांनी देशापुढील संधींचा आलेख यावेळी मांडला.  विविध उद्योग, व्यवसायांसाठी देशाच्या क्षितीजापलीकडे मोठ्या संधींचे आकाश उपलब्ध असून या संधी त्यांची वाट पाहात आहेत. त्यांना पूरक ठरेल अशी धोरणे शासन आखत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. 
 
उद्योगांच्या वाढीसाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांना विविध राज्यांचे सहाय्य लाभत असल्याने याचा देशाच्या प्रगतीसाठी चांगला उपयोग होणार आहे. महाराष्ट्राचे उद्योगातील योगदान महत्त्वाचे असून देशाच्या प्रगतीसाठी या आंतराष्ट्रीय प्रदर्शनाचा नक्की फायदा होईल असेही ते म्हणाले. 
 
@@AUTHORINFO_V1@@