मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेची ती शाखा सीबीआयद्वारे बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2018
Total Views |

 
मुंबई : मुंबई येथील पंजाब नॅशनल बँकेची ब्रेडी हाउस शाखेला सीबीआयद्वारे कुलूप लावण्यात आले आहे. ११ हजार ४०० कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या निरव मोदी या उद्योजकाचे सर्व संबंधांची छाननी सीबीआयद्वारे केली जात आहे. याचबरोबर त्याचा भागीदारी मेहुल चोकसी याची देखील सीबीआय चौकशी सुरु आहे.
 
 
निरव मोदीचा मुख्य आर्थिक सल्लागाररवी गुप्ता यास सीबीआयतर्फे समन्स बजावला गेला आहे. त्याचबरोबर सीबीआयद्वारे ११ पीएनबी अधिकाऱ्यांना देखील चौकशीच्या कक्षेत आणले गेले असून, त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे.
 
 
निरव मोदी याला दिलेले पत्रक खोटे होते, हे तपासात उघडकीस आले असून, त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना यात दोषी धरले जाणार असून, याप्रकरणात इतर ही सामील अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासंबंधी सीबीआयने नोटीस जरी केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@