नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2018
Total Views |
 

 
 
 
नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या हस्ते आज जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या चौथ्या टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
 
 
 
 
 
व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली. नवी मुंबईमध्ये हे विमानतळावर तयार होणार असल्याने पनवेल भागात राहत असलेल्या नागरिकांना हे विमानतळावर सोयीचे पडणार आहे. महाराष्ट्र राज्यासाठी हा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@