राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सोमवारी शिवजयंती सोहळ्याचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती सोहळ्याचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी ६  वाजता जनपथ मार्गावरील इंदिरा गांधी कला केंद्रात होणार असून हा कार्यक्रम अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.
 
राजधानीत १९   व २० फेब्रुवारी २०१८  रोजी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनांसह शिवजयंती सोहळा साजरा होणार असून राष्ट्रपती या सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या पटांगणावर सायंकाळी ६  वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास करवीर अधिपती शाहू छत्रपती महाराज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यासह लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा, कर्नल ऑफ द रेजिमेंट मराठा लाईट इन्फेट्री पी.जे.एस.पन्नू , जनरल जे.जे. सिंग (निवृत्त) या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
 
 
या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित 'शिवगर्जना' महानाट्याचा प्रयोग सादर होणार आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@