छिंदमच्या वक्तव्याचा रा. स्व. संघाने केला निषेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |

 
पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उद्गारलेल्या अपशाब्दांमुळे अहमद नगरचा माजी महापौर श्रीपाद छिंदमच्या वक्तव्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाहीर निषेध व्यक्त केला आहे. त्यासाठी संघातर्फे एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, १६ फेब्रुवारी २०१८ नगर येथे घडलेला छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा प्रसंग अत्यंत दुर्दैवी आणि चीड आणणारा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा रीतीने महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रवृत्तीची अत्यंत कठोर शब्दात निंदा करतो. समाजातील कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे निंदनीय आहे. असे मत संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी या पत्रकात मांडले आहे.
 
 
त्याचबरोबर छिंदमवर योग्य ती कठोर कारवाई व्हावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@