नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |

भाजपच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षांचा दावा

 
 
 
 
 
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध नाही, उलट कोकणातील युवकांना हा प्रकल्प हवा आहे. तसेच विरोधी वातावरण असल्याचे सांगून काहीजण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, दावा भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष बाळ माने यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला.
 
रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक प्रकल्पविरोधी संघटनांच्या प्रतिनिधींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. या घटनेबाबत बाळ माने यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले.
 
ते म्हणाले की, मुळात प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध नाही. सुमारे २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक याद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात होत असून यातून १ लाख युवकांना रोजगारही मिळू शकणार आहे. तसेच प्रकल्पातील सहभागी कंपन्या या सर्व भारत सरकारच्या कंपन्या आहेत. तसेच, या प्रकल्पातून कोणतेही प्रदूषण होणार नाही, त्यामुळे कोकणातील युवकांना हा प्रकल्प यायला हवा असल्याचे माने यांनी सांगितले. त्यामुळेच स्थानिक जनतेचा विरोध असल्याचे सांगून काहीजण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही माने यांनी केला.
 
@@AUTHORINFO_V1@@