हल्लाबोल यात्रेला होणारी गर्दी ही नव्या बदलाची नांदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |

राष्ट्रवादी नेत्यांनी प्रकट केला विश्वास




नाशिक :
राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला होणारी गर्दी ही नव्या बदलाची नांदी असून लवकरच राज्यात सत्ता पालट होईल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून आज व्यक्त करण्यात आला. हल्लाबोल यात्रेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या सभांमध्ये ते बोलत होते.

राष्ट्रवादी सध्या विरोधी बाकावर जरी बसली असली तरी राष्ट्रवादीचा संघर्ष हा सामान्य जनतेच्या हितासाठी सुरु आहे. देशाचे पंतप्रधान विकासाच्या गप्पा मारत आहेत. परंतु खरा विकास म्हणजे काय हे यांना माहितच नाही, अशी टीका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.

तसेच सेना आणि भाजपच्या कार्यकाळात राज्याच्या शेतकरी, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा विकास खुंटला आहे. सरकार काम करण्याऐवजी फक्त गप्पा ठोकत आहे, त्यामुळे अशा सरकारला हाकलून देणेच जनतेच्या हिताचे आहे, असा हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच २०१९ ला काहीही झाले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या पक्षाशी आघाडी करेल, ते सत्तेवर येतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मुंडे यांनी देखील सरकारला लक्ष करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महागाईचे कारण देत भाजपने निवडणुकांच्या काळात महागाईबाबत जाहिराती केल्या. युपीएच्या काळात ६० रु. किलो डाळ होती, पेट्रोलचे दर ६० रु. होते, ३५० रु.चे सिलेंडर मिळत होते. तेव्हा सरकार म्हणत होते, देशात महागाई आहे. आज याच गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत. पण कोणाला कळूही दिले नाही, अशी खोचक टीका मुंडे यांनी यावेळी केली.
@@AUTHORINFO_V1@@