निवडक उद्योजकांसाठी सरकारकडून पर्यावरणाचा बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

 
 
 
 
 
मुंबई : राज्यात काही निवडक उद्योजकांच्या फायद्यासाठी सरकार पर्यावरणाचा बळी देत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. तसेच राज्यसरकार राज्यातील हरितपट्टा आणखी कमी करत असल्याचेही ते म्हणाले. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
राज्यातील नव्या एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प धोरणानुसार आदिवासी जमिनी, राष्ट्रीय उद्यानांचा बफर झोन, खाजगी वने, पर्यावरण संवेदनशिल क्षेत्र, इत्यादींचा नगरवसहतींच्या प्रकल्पाकरिता अंतर्भाव त्या जागा वापरण्याचा घाट सरकार घालत असल्याचे सावंत म्हणाले. उद्योजकांना येणा-या अडचणी लक्षात घेऊन त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी असे प्रकार चालू आहेत. तर राज्यातील उद्योग धोरण हे लघु आणि मध्यम क्षेत्रासाठी अनास्था दर्शवणारे आहे. २०१५ साली महाराष्ट्राचा देशात आठवा क्रमांक होता, २०१६ ला तो दहावा झाला आणि आता तो तेरावा झाला आहे. यातून सरकारची कार्यपद्धती आणि त्यांच्या धोरणांमधील विसंगती दिसच असल्याचे सावंत म्हणाले.
 
तसेच मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या इव्हेंट मॅनेजमेंटचे काम गुन्हा दाखल झालेल्या आणि काळ्या यादीत टाकलेल्या विझक्राफ्ट या कंपनीला देऊन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांची फसवणूक केली असून त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
 
@@AUTHORINFO_V1@@