कौशल्य विकास अंतर्गत ५४ युवकांना नोकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : ‘‘लोकसंख्येच्या मानाने उपलब्ध होत असलेले सन्मानजनक रोजगार कमी असताना ’स्कील इंडिया मिशन’ अंतर्गत निसाच्या प्रयत्नांनी होत असलेले हे काम कौतुकास्पद असून या माध्यमातून औद्योगिक सुरक्षारक्षकाची नोकरी मिळालेल्या मुलांकडून देशाची सेवा घडो,’’ अशा सदिच्छा देत खासदार गोडसे यांनी मुलांचे अभिनंदन केले.
 
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एनएसडीसी) कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयाच्या अंतर्गत स्किलिंग प्रकल्पाअंतर्गत निसा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रा. लि. च्या प्रशिक्षण केंद्रातून नाशिक विभागातील ५४ तरुणांना औद्योगिक सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती मिळाली असून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पंचवटी विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रांगणात खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी निसाच्या ग्रुप प्रेसिडेंट रुपल सिन्हा, सीईओ प्रसेनजीत सेनगुप्ता, नॅशनल ट्रेनिंग हेड दीपंजन चक्रवर्ती, रिजनल हेड जैनेन्द्र चतुर्वेदी, राज्य प्रमुख नफिज अहमद, नाशिक सेंटर हेड गौतम शिरसाठ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
 
भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या सुरक्षारक्षकांकडून युवकांना नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात उच्च प्रतीचे निवासी प्रशिक्षण दिले जाईल. उमेदवारांना आग-लढाई, प्रथमोपचार, तात्काळ नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, ऍक्सेस कंट्रोल, शोध आणि फवारणी प्रक्रिया, सुरक्षा कार्य आणि कायदेशीर प्रक्रिया, कायदेविषयक तरतुदी विस्फोटक यंत्रे (आयईडी), चौकशी आणि गुप्तचर यंत्रणा, शारीरिक प्रशिक्षण, योग, परेड, संप्रेषण कौशल्य आणि आयटी कौशल्य आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रयत्नात, अलीकडेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामीण विकास विभाग व पंचायती राज, शासनाकडून निसा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड यांना मंजुरी मिळाली आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (डीडीयू-जीकेवाय) प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण युवक कौशल्य विकास योजना, नाशिक विभागासाठी महाराष्ट्र सरकारसोबत काम करत आहे. निसा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रा. लि. महाराष्ट्रातील आणि देशभरातील युवकांसाठी नोकरी निर्मितीसाठी योगदान देण्यासाठी समर्पित आहे.
@@AUTHORINFO_V1@@