'विरासत'मधून वाद्यकालाकारांनी जिंकली पुणेकरांची मनं!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2018
Total Views |
 
जुगलबंदीला रसिकांची विशेष दाद! 

 
 
पुणे: भारतीय वाद्य संगीत आणि पाश्चीमात्य वाद्य संगीताचा आस्वाद आज पुणेकरांना अनुभवण्यास मिळाला. आज पुणे येथील महालक्ष्मी मैदानावर संगीतकार राहुल रानडे प्रस्तुत ‘विरासत’ हा वाद्य संगीताचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी पुणेकरांना भारतीय वाद्य संगीत आणि पाश्चीमात्य वाद्य संगीताची जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली. या कार्यक्रमात दिग्गज वादक मंडळी उपस्थित होते.
 
प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन, व्हॉयलीन वादक कुमरेश, झेम्बे वादक तौफिक कुरेशी, बँड वादक लुईस, घटम वादक विक्कू विनायकराम, सेल्वा गणेश, गिनो बँक्स आणि गणेश यांच्या वाद्य संगीताने सगळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झालीत. हिंदुस्थानी, दाक्षिणात्य, पाश्चीमात्य अशा विविध संगीत संस्कृतीचा मिलाफ यावेळी या मैफिलीत प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळाला. या कार्यक्रमाचे आकर्षण झाकीर हुसेन हे होते. झाकीर हुसेन यांच्या तबलावादनाने पुणेकरांचे मन जिंकले.
 
 
 

 
 
या कार्यक्रमात तबला, बँड, घटम, व्हॉयलीन, डफ आणि झेम्बे या वादनांची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. व्हॉयलीन वादनात दक्षिण हिंदुस्थानी संगीताची झलक पाहायला मिळाली असून यात ‘अदुभूत’ संगीताचा प्रकार यावेळी सादर करण्यात आला. तबला आणि झेम्बेच्या जुगलबंदीने प्रेक्षकांना अजूनच मंत्रमुग्ध केले. तर बँडच्या संगीताने प्रेक्षकांना जागेवरून उठून नाचण्यास भाग पाडले.
 
 
यावेळी ‘पुर्या धनश्री’ रागाशी साधर्म्य साधणारे गायन देखील सादर करण्यात आले. या मंचावर पुणेकरांना ‘फ्युजन’ संगीताचा आविष्कार अनुभवायला मिळाला. घटम, तबला, झेम्बे आणि बँड यांचे उत्कृष्ट तालबद्ध संगीत प्रेक्षकांना ऐकायला मिळाले. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्या वाद्यांची जुगलबंदी ही तर प्रेक्षकांना अविस्मरणीयच ठरली. 
 
 
'विरासत' कार्यक्रमाचे आयोजक राहुल रानडे यांनी त्यांच्या
फेसबुक अकाउंट वरून शेअर केलेले काही छायाचित्र...
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@