आपल्यातील विद्यार्थी कधीही मारू नका: नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली: आपल्यामधील विद्यार्थी कधीही मारु नका असा मोलासा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आज नवी दिल्ली येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते यावेळी त्यांनी वरील सल्ला विद्यार्थ्यांना दिला. १२ वी आणि १० वीच्या मुलांची परीक्षा तोंडावर आली असल्याने त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा तसेच मार्गदर्शन देण्यासाठी आज नरेंद्र मोदी यांनी भाषण केले.
 
 
परीक्षेला घाबरून चालणार नाही परीक्षेकडे तुम्ही सगळ्यांनी उत्सवाच्या नजरेने पहा परीक्षेला जर तणावाच्या नजरेने पहिले तर तुम्ही जितकी उंची या परीक्षेत गाठू शकता तेवढी देखील तुम्ही उंची परीक्षेत गाठू शकणार नाही अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. परीक्षेला आपल्या जीवनाची परीक्षा न समजता ती केवळ शालेय परीक्षा आहे असे समजा कारण जीवनाच्या परीक्षेत तर तुम्हाला व्यवहारी ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यामुळे परीक्षेला सकारात्मक नजरेने पहा असे त्यांनी यावेळी म्हटले.
 
 
 
आपल्यातील कला ओळखा तसेच त्यांचा शोध घ्या असे ते यावेळी म्हणाले. दुसऱ्यांची तुलना स्वत:सोबत करू नका असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
@@AUTHORINFO_V1@@