हिंदुत्ववादी संघटनांतर्फे छिंदम विरोधात पोलिसात तक्रार दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2018
Total Views |

 
 
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणऱ्या अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम विरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनांतर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यासह फोनवर संवाद साधतानाचा ऑडीओ व्हायरल झाला असून, यात छिंदम याने अपमानकारक शब्दांचा वापर केला आहे.
 
या ऑडीओनंतर समाजमाध्यमातून संतापाची लाट उसळत असून, सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी त्याविरोधात मोर्चा काढला असून त्याचा जाहीर निषेध नोंदवला आहे. डेक्कन पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रार पत्रकात नमूद केले आहे की, श्रीपाद छिंदम याने महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानजनक विधान केले आहे. यामुळे समस्त नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. सर्व हिंदुत्ववादी संघटना याचा जाहीर निषेध करत असून भारतीय दंड संहिता कलम १५३ अ, २९५ तसेच राष्ट्रद्रोहाचा कलमान्वये तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.
 
 
बजरंग दल, पतित पावन संघटना, राजे शिवराय प्रतिष्ठान, शिवरुद्र प्रतिष्ठान, हिंदुराष्ट्र मंडळ, भगवा ग्रुप, शिवसृष्टी प्रतिष्ठान, अखंड भारत प्रतिष्ठान, युवा चेतना मंच, शिववंदना समूह आणि इतर सर्व शिवप्रेमी हिंदुत्ववादी संघटना या तक्रार दाखल करण्यासाठी एकत्रित आल्या.
 
 
फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गुडलक कॅफे चौकात त्याविरोधात निषेध सभा देखील आयोजित करण्यात आली होती.
 

 
@@AUTHORINFO_V1@@