नाणेफेक जिंकत भारताची प्रथम गोलंदाजी करण्यास सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
सेंचुरियन : दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात आजचा सहावा एकदिवसीय सामना सुरु झाला आहे. सेंचुरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे हा सामना खेळला जात असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पोर्ट एलिझाबेथ येथे झालेला पाचवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना भारताने ७३ धावांनी आपल्या खिशात घातला होता. त्यामुळे आता सहा सामन्यांच्या या मालिकेत भारत आघाडीवर असून ही मालिका भारताने जिंकून घेतली आहे.
 
 
 
 
त्यामुळे आजच्या सामन्यात दोघांपैकी कोणताही संघ जिंकला तरी देखील या मालिकेचा विजेता भारतच ठरणार आहे. मात्र तरी देखील दक्षिण आफ्रिकेला पुरतेच नमवायचे असेल तर आजचा सामना आणि यापुढील सातवा एकदिवसीय सामना भारताकडे आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताने मुसंडी मारली तर ही मालिका भारतासाठी चांगलीच ऐतिहासिक ठरणार आहे.
 
 
 
दक्षिण आफ्रिकेकडून मैदानावर प्रथम हाशीम अमला आणि एडन मार्कम यांच्या जोडीने खेळण्यास सुरुवात केली आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिका १८ धावांमध्ये शून्य बाद स्थितीत खेळत आहे. आता आजचा सामना कोण जिंकत याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
@@AUTHORINFO_V1@@