उच्चस्तरीय जर्मन शिष्टमंडळ नाशिक दौर्‍यावर येणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : विश्व शैक्षणिक सांस्कृतिक केंद्र आणि भारत-जर्मनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एका उच्चस्तरीय जर्मन शिष्टमंडळाचा भारत दौरा आखण्यात आला असून लवकरच हे शिष्टमंडळ नाशिक दौर्‍यावर येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष प्रा. दीपक मगरे आणि महासचिव माधव गाडगीळ यांनी दिली.
 
या मंडळामार्फत गेल्या २७ वर्षांपासून भारत व युरोपातील प्रमुख देश जसे फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, स्वित्झर्लंड, बेल्जियम या देशात शैक्षणिक-सांस्कृतिक आदान-प्रदानाचे कार्य सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गतच फेब्रुवारीअखेर एक उच्चस्तरीय जर्मन शिष्टमंडळ नाशिकच्या शैक्षणिक दौर्‍यावर येत आहे. यात शास्त्रज्ञ, कुलगरू, निर्देशक, उच्चाधिकारी, अर्थतज्ज्ञ, भौतिक चिकित्सक आदींचा समावेश आहे.
 
या दौर्‍यादरम्यान जर्मन शिष्टमंडळ नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना भेट देऊन संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, संशोधकछात्र यांच्याशी संवाद साधणार आहेत. नाशिक परिसरातील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक यांना जर्मनी व इतर युरोपीयन देशातील विद्यापीठात, अकादमीत जाऊन उच्च शिक्षण, संशोधन कार्य करण्याच्या दुर्मीळ संधीबाबतही मार्गदर्शन जर्मनतज्ज्ञ करणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@