दोन आठवड्यात धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2018
Total Views |
 
 
 
मुंबई, (जयदीप दाभोळकर) : शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना येत्या दोन आठवड्यांमध्ये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
 
मंत्रालयाच्या आवारात विष प्राशन करून ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली होती. त्यांना योग्य तो मोबदला मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले होते. त्यांनंतर त्यांच्या जमिनीच्या पूनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हाधिका-यांनी पूनर्मूल्यांकन करून त्यांना ५४ लाखांची नुकसान भरपाई देण्याची शिफारस केली.
 
त्यानंतर जिल्हाधिका-यांनी आपला अहवाल ऊर्जा विभागाकडे सोपवला होता. दरम्यान, त्यांच्या पिकांचे झालेले एकंदरीत नुकसान आणि त्यावरील एकूण व्याजाची रक्कम याचे मूल्यांकनाचे काम सुरू असून लवकर ते पूर्ण करण्यात येणार आहे. मूल्यांकनानंतर त्याचा अहवालदेखील सोपवण्यात येणार असून येत्या दोन आठवड्यांमध्ये धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईची एकूण रक्कम देण्यात येणार आहे.
 
दोन शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर
शेतक-यांचे हिताचा निर्णय घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान दोन शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर या योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. ही योजनादेखील अंतिम टप्प्यात असून येत्या १५ दिवसांमध्ये योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@