कावेरीचा वाद मिटणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2018
Total Views |

सर्वोच्च न्यायालय आज करणार सुनावणी





नवी दिल्ली :
गेल्या दशकभरापासून कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात सुरु असलेल्या कावेरी नदीच्या जलवाटप प्रश्नासंबंधीच्या अंतिम सुनावनीला आज सर्वोच्च न्यायालय सुरुवात करणार आहे. न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षततेखाली तीन न्यायाधीशांचे खंडपीठ आज या संबंधी सुनावणी करणार आहे. त्यामुळे गेल्या दशक भराचा हा जल'वाद' अखेर मिटणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज सकाळी १० नंतर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर सुनावणी करण्यास सुरुवात करणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टिस अमिताव रॉय आणि जस्टिस ए.एम. खानविलकर या तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. यासाठी दोन्ही राज्यांच्या प्रतिनिधींना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि इतर पुरावे न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कर्नाटक आणि तामिळनाडू राज्याचे प्रतिनिधी सध्या दिल्लीमध्येच उपस्थित असून या प्रकरणी न्यायालय काय ? सुनावणी करणार आहे, याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.

कावेरी नदीच्या जलवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने वाद होत आला आहे. ब्रिटीशकाळामध्ये मद्रास प्रांत आणि मैसूर संस्थान या या दोघांमध्ये कावेरीच्या जलवाटपासंबंधी एक करार झाला होता. त्यानुसार दोन्ही प्रांतांना या नदीच्या पाण्याचे वाटप केले जात होते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दोन्ही राज्यांच्या मागण्या बदलल्यानंतर या जुन्या करारावर नवा वाद सुरु झाला. हे प्रकरण २००७ मध्ये उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयावर दोन्ही पक्षांनी असंतोष व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाचा रस्ता धरला होता.

दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री इ.पलानिसामी यांनी या वादावर चर्चा करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना नुकतेच काही दिवसांपूर्वी निमंत्रण पाठवले होते. परंतु कर्नाटक सरकारकडून त्यावर कसलेही प्रतिउत्तर गेलेले नाही. कावेरी जलवाटपावरून प्रत्येक वर्षी दोन्ही राज्यांमध्ये होणाऱ्या आंदोलनामुळे प्रत्येक वर्षी कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान होते. त्यामुळे हे प्रकरणी लवकर सुटावे, अशीच अपेक्षा सर्वांकडून व्यक्त केली जाते.
@@AUTHORINFO_V1@@